Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडमोदी सरकारकडून अण्णाभाऊ साठेंची अवहेलना केंद्र म्हणतं, अण्णाभाऊ प्रसिद्ध नाहीत, ना. मुंडेंकडून...

मोदी सरकारकडून अण्णाभाऊ साठेंची अवहेलना केंद्र म्हणतं, अण्णाभाऊ प्रसिद्ध नाहीत, ना. मुंडेंकडून दखल

महापुरुषांच्या सुचीत सन्मानपुर्वक नाव समाविष्ट करायला भाग पाडू -ना. मुंडे
बीड (रिपोर्टर) पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती उपेक्षीतांच्या तळहातावर तरली आहे. असे स्पष्ट सांगत शोषीत, दिनदलित, पिडितांच्या वेदना शब्दबद्ध करीत शौर्याची दौलत देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत नसल्याचे कारण पुढे करत केंद्रातील मोदी सरकारने प्रबोधनकारांसह महापुरुषांच्या यादीत अण्णाभाऊंचे नाव सामील करण्याचे नाकारल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून याची गंभीर दखल सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केंद्र सरकारला प्रतिष्ठीत वाटत नसतील तर हे दुर्दैव आहे. साहित्यरत्नांची माहिती केंेद्राला नसेल तर आम्ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अहवाल केेंद्राला पाठवू आणि महापुरुषांच्या सूचीत अण्णाभाऊंचे नाव सन्मानपूर्वक समाविष्ट करायला भाग पाडू, असे ट्विटद्वारे धनंजय मुंडेंनी सांगितले.


केंद्रातील मोदी सरकारच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनने तयार केलेल्या देशभरातील महापुरुष, समाजसुधारक यांच्या सूचीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव समाविष्ट केलेले नाही. देशभरातील महापुरुष, समाजसुधारक यांच्या विचाराचा प्रसार व प्रचार करण्यासाठी या फाऊंडेशनची निर्मिती करण्यात आलेली आहे. या फाऊंडेशनच्या सूचीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे नाव नसल्याचे समोर आले. त्यापेक्षा भयंकर अण्णाभाऊ प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत नसल्याचे कारण पुढे करून केेंद्राने त्यांचे नाव या सूचीत घेतले नसल्याची बाब जेव्हा समोर आली तेव्हा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध आहे. तेरा लोकनाट्य, तेरा कथा, सहा नाटके, पस्तीस कादंबर्‍या, पंधरा पोवाडे, सात चित्रपट कथालेखनाचे धनी असलेल्या अण्णा भाऊंचे साहित्य दहा भाषांमध्ये अनुवादित आहे, हे केंद्र सरकारला माहित नसावं हे दुर्दैव. याची गंभीर दखल राज्याचे सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांनी आज घेतली. त्यांनी दोन ट्विट करून केंद्र सरकारला अण्णाभाऊ माहित नसणे हे दुर्दैवी असल्याचे म्हटले. आपल्या ट्विटमध्ये मुंडे म्हणतात, आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केेंद्र सरकारला प्रतिष्ठित वाटत नसतील तर हे दुर्दैवी आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊंची माहिती केंद्राला नसेल तर आम्ही राज्य सरकारमार्फत अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा अहवाल केंद्राला पाठवू. केंद्राने नियुक्त केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनने तयार केलेल्या महापुरुषांच्या सूचीत अण्णाभाऊंचे नाव सन्मानपूर्वक समाविष्ट करायला भाग पाडू, असे धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!