Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडसोशल डिस्टन्स पाळत पदवीधरांच्या मतदानासाठी रांगा,दुपारपर्यंत बीड जिल्ह्यात 21 टक्के मतदान

सोशल डिस्टन्स पाळत पदवीधरांच्या मतदानासाठी रांगा,दुपारपर्यंत बीड जिल्ह्यात 21 टक्के मतदान


मतदारसंघातल्या 78 तालुक्यात तर बीड जिल्ह्यातल्या 131 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात

चव्हाण, बोराळकर पोकळेंसह 35 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
बीड/औरंगाबाद (रिपोर्टर)- अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी मराठवाड्यातील 78 तालुक्यात तर बीड जिल्ह्यातील 131 मतदान केंद्रांवर आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून कोरोनाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्स सह अन्य खबरदारी घेत हे मतदान होत आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे दुपारी 1 वाजेपर्यंत बीड जिल्ह्यातील 131 मतदान केंद्रांवर 21 टक्के तर मतदार संघात अंदाजे 20 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येते. सदरचं मतदान हे शांततेत होत असून सायंकाळी 5 वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण, भाजपाचे शिरीष बोराळकर, भाजपा बंडखोर उमेदवार रमेश पोकळेंसह 35 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.


औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात तब्बल 3 लाख 74 हजार 45 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण, भाजपाकडून शिरीष बोराळकर तर भाजपाचे बंडखोर रमेश पोकळे यांच्यासह तब्बल 35 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपात बंडखोरी झाल्याने ही निवडणूक भाजपासाठी डोकेदुखी ठरत असून मतदारसंघातल्या तब्बल 813 मतदान केंद्रांवर आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यात 64 हजार 349 मदारांसाठी 131 मतदान केंद्रांवर आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीत मतदार हा पदवीधर असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. कोरोनाच्या अनुषंगाने सोशल डिसटन्स पाळत अन्य उपाययोजना आखत हे मतदान होत आहे. महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत मतदानाच्या दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यातील 131 मतदान केंद्रांवर बर्‍यापैकी मतदारांची गर्दी दिसून आली. अनेक मतदान केंद्रांवर रांगा पहावयास मिळाल्या. हीच स्थिती मतदारसंघातल्या 78 तालुक्यात पहावयास मिळत होती त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदान मोठ्या प्रमाणावर झाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा बीड जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत 21 टक्के मतदान झाले होते तर मतदारसंघात 20 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी 5 वाजता प्रमुख उमेदवारांसह तब्बल 35 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!