Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडअनाथांच्या माईला अखेरचा निरोप

अनाथांच्या माईला अखेरचा निरोप


पुण्याच्या ठोसर बागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार महानुभव पंथानुसार माईंचा दफनविधी
पुणे (रिपोर्टर)- अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थीवदेहावर आज सकाळी पुणे येथील ठोसर बागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधूताई यांचा अंत्यसंस्कार महानुभव पंथानुसार दफनविधी करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने लोक सिंधूताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी साश्रू नयनांनी उपस्थित होते.

हरनियाचा त्रास सुरू झाल्यामुळे रात्री त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही झाली होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या कार्याची जगभरात ओळख आहे. गेल्या सहा दशकांच्या कालखंडात त्यांच्यावर ओढवलेले प्रसंग आणि त्यांनी अनाथांसाठी केलेले काम हे जगप्रसिद्ध आहे. आज सकाळी त्यांचा पार्थीवदेह अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर सिंधूताईंची अंत्ययात्रा पुण्यातील ठोसर बागेपर्यंत नेण्यात आली. त्याठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापुर्वी माईंना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. माईंचे कार्य हे अलौकिक आहे. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र अनाथ झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महानुभव पंथानुसार त्यांच्या पार्थीवदेहावर पुण्यातील ठोसर बागेत साश्रू नयनाने दफनविधी करण्यात आला.

Most Popular

error: Content is protected !!