Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeकोरोनालॉकडाऊन नाही मात्र ‘कडक निर्बंध’, मंत्रालयात महत्वपुर्ण बैठक, चौकाचौकात अँटीजेन टेस्ट करण्याची...

लॉकडाऊन नाही मात्र ‘कडक निर्बंध’, मंत्रालयात महत्वपुर्ण बैठक, चौकाचौकात अँटीजेन टेस्ट करण्याची तयारी


लस न घेणार्‍यांवर आता कठोर कारवाई, खासगी रुग्णालयात बुस्टर डोस मिळणार, बैठकीनंतर राजेश टोपेंनी मंत्रालयात दिली माहिती
पाच महत्वाचे निर्णय…
अँटिजन टेस्ट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. यासाठी आता चौका चौकात अँटिजन चाचणीसाठी बुथ उभारण्यात येणार आहे. अँटिजन पॉझिटिव्ह आल्यास चाचणी करण्याची गरज नाही.
ज्यांची लस झालेली नाही त्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक असल्याचे टोपे यांनी सांगितले.

ज्यांना ज्या भाषेत समजतं, त्यांना त्याच भाषेत समजवणार असल्याचाही इशारा राजेश टोपे यांनी दिले.
लॉकडाऊनची आज गरज नाही. पण रुग्णसंख्या पाहून निर्बंध लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निर्बंध तातडीने लागू होणार नाहीत. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे
सध्याच्या नियमांप्रमाणे बुस्टर डोस शासकीय रुग्णालयात घ्यावे लागणार आहे. मात्र, खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचार्‍यांना बुस्टर डोस त्यांच्याच रुग्णालयात देण्यास परवानगीग देण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळावी लागणार आहे.
मुंबई (रिपोर्टर) राज्यातला कोरोना रोखण्यासाठी येथून पुढे कोरोना नियमाच्या अनुषंगाने नागरिकांसाठी सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे करण्यात आल्याची माहिती देत लसीकरणावर जोर देण्यासाठी मोठे प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगून कोरोना रुग्ण वाढत जाणार असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर टेस्टींग वाढवल्या जाणार आहेत. त्यासाठी चौका चौकात अँटीजेन टेस्ट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून बुस्टर डोस खासगी दवाखान्यात उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज सांगितली.

गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची दुपटीने वाढ होत असून काल दिवसभरात २५ हजाराच्या आसपास राज्यात रुग्ण मिळून आले. हा आकडा उद्या ३० हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. लसीकरणामुळे ९० टक्के रुग्णालय गंभीर लक्षणे नसल्याचे सांगून वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी रोखण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी म्हटले. लॉकडाऊन हा विषय सध्यातरी काढण्याची गरज नाही, परंतु गर्दी रोखण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोना टेस्टींग वाढवण्याची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. आरटीपीसीआरच करणे बंधनकारक नाही, परंतु अँटीजेन टेस्टवर भर देण्याची गरज असल्याचे सांगून त्यासाठी चौका चौकात अँटीजेन टेस्ट उपलब्ध करून (पान ७ वर)
देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. क्वॉरंटाईनचा कालावधी सात दिवसांचा असणार असल्याचे त्यांनी म्हटले. सौम्य लक्षणे असणार्‍यांना गृहविलिगीकरणात ठेवून त्यांच्यावर निरीक्षण
करणार असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले. सध्या पावणे दोन लाख टेस्ट रोज करण्याची महाराष्ट्रात क्षमता आहे. त्यामुळे अँटीजेनवर भर देवून त्याचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी लवकरच यंत्रणा उभारणार असल्याचे टोपे म्हणाले. सध्याची परिस्थिती ही शंभर टक्के लॉकडाऊनची नसून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या आणि ज्याची गरज नाही, त्या थांबवता येतील का? याबाबत बैठकीत चर्चा झाली. वाढत्या रुग्णसंख्येला थांबवायचं असेल तर गर्दी थांबवणं अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. मास्क न वापरणार्‍यांना पाचशे रुपये दंड तर थुंकणार्‍यांना एक हजार रुपये दंड करावा, अशा सूचना याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Most Popular

error: Content is protected !!