मुंबई :
सत्ता येते-जाते परत येते, परंतु लोकांच्या अश्रूची प्रतारणा केली नाही. विचित्रपणानेशिवसेनाप्रमुखांचामुलगा मुख्यमंत्रिपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होणं हे जनतेला आवडेल न आवडेल माहिती नाही परंतु हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. तो धृतराष्ट्रासारखा नाही. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असंउद्धव ठाकरेंनीम्हटलं आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुखउद्धव ठाकरे
काल(दि.30 जून) शिवसेनेचे बंडकोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदेराज्याचे नवे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता आज शिवसेनापक्षप्रमुखउद्धव ठाकरेयांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला केला. यावेळी त्यांनी परत एकदा अडीच वर्षांपूर्वीच्या अमित शहांच्या शब्दाची आठवण करुन दिली.’हेच मी मागितलं होतं’यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ’’सर्वप्रथम मी नवीन सरकारचे अभिनंदन करतो. सरकारकडून महाराष्ट्राचं भलं व्हावं, हीच त्यांच्याकडे अपेक्षा. माझ्यासमोर काही प्रश्न पडले. ज्यापद्धतीने हे सरकार स्थापन झालं, त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री केलां. हेच मी अडीच वर्षांपूर्वी मागितलं होतं. तसं झालं असतं तर आज अडीच वर्षे झालीच आहेत, कालचा कार्यक्रम सन्मानाने झाला असता.’’’तेव्हा पाठीत वार केला…’’’तेव्हा नकार देऊन आता भाजपने असं का केलं? शिवसेना तुमच्यासोबत होतीच ना. लोकसभा आणि विधानसभेतही तुमच्यासोबत होती. निवडणुकीच्या आधी हेच ठरलं होतं. मला कशाला मुख्यमंत्री बनवायला लावलं. अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, माझ्या पाठीत वार केला. हे म्हणत आहेत की, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. पण, तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेलाच नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून मुख्यमंत्री होऊ शकत नाही.’’’अमित शहांनी शब्द मोडला’’’तेव्हा अमित शहांनी दिलेला शब्त पाळला असता, तर किमान अडीच वर्षे भाजपचा मुख्यंत्री झाला असता. आता पाचही वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. आम्हीही तेव्हा माझ्या स्वाक्षरीचा करार करुन तो मंत्रालयात लावला असता. म्हणजे, तो सगळ्यांना दिसला असता. पण, त्यांनी शब्द पाळला नाही, पाठित खंजीर खुपसले,’’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की,
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सगळीच राजकीय समीकरणं बदलताना दिसू लागली आहेत. भाजपाचं संख्याबळ सर्वात जास्त असूनही देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवल्याचा दावा शिंदे गट आणि भाजपाकडून केला जात असला, तरी शिवसेना त्यांना शिवसैनिक मानायला तयार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली आहे.
आरेच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी रात्रीस खेळ चाले हे त्यांचं ब्रीदवाक्य झाल्याचा टोला लगावला. आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. मला दु:ख झालंय ते म्हणजे माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याने मला दुख झालं आहे. रात्रीस खेळ चाले, हे त्यांचं आता ब्रीदवाक्य आहे. एका रात्रीत आरेमध्ये झाडांची कत्तल झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याला कांजूरमार्गचा पर्याय सुचवला. कामावर स्थगिती दिली. मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे. संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी असं माझं मत आहे, असं ते म्हणाले.
सत्तेवर आल्यानंतर आरे कारशेडसंदर्भात नव्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आरेमधून कांजूरमार्गला नेलेलं कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यावरून पर्यावरणवाद्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना उद्धव ठाकरेंनी त्यावरून राज्य सरकारला आवाहन केलं
लोकशाही धोक्यात
’’लोकशाहीचे चार स्तंभ असतात, या चारही स्तंभाने लोकशाही वाचवायला पुढे यायला पाहिजे. लोकशाही उरली नाही तर या स्तंभाला काहीही अर्थ राहणार नाही. आपल्याकडे गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. ज्याने मतदान केले त्याला कळायला हवं कुणाला मतदान हवं. आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. निवडून आलेल्या प्रतिनिधीला बोलावण्याचा अधिकार हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. माहिमच्या मतदाराने टाकलेले मत व्हाया सूरत, व्हाया गुवाहाटी गोवा फिरत असेल तर लोकशाही आहे कुठे?’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.