बीड (रिपोर्टर)ः- बहीरवाडीचे सरंपच बाजीराव भगवानराव बोबडे वय-48 वर्षे यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थीव देहावर आज सकाळी बहीरवाडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बहीरवाडीचे सरपंच बाजीराव भगवानराव बोबडे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची रात्री प्राणज्योत मालवली. आज सकाळी बहीरवाडी येथील त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बोबडे यांनी तिन टर्म सरपंच पद भुषवले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते गेल्या अनेक वर्षापासून सक्रीय होते. त्यांच्या निधनाने बहीरवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले, भाऊ, असा मोठा परिवार आहे. बोबडे परिवाराच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.