Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडसोयाबीनचे पोते लंपास करणार्‍या चोरट्यांच्या बांधल्या मुसक्या माजलगाव ग्रामीण पोलिसांनी दोघांना घेतले...

सोयाबीनचे पोते लंपास करणार्‍या चोरट्यांच्या बांधल्या मुसक्या माजलगाव ग्रामीण पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात


बीड (रिपोर्टर) पात्रूड येथील एका शेतकर्‍याने मोठ्या मेहनतीने पाच एकर शेतात सोयाबीनचे पिक घेतले होते. ती सोयाबीन मळणी यंत्राद्वारे काढून शेतात पोत्यात भरून शेतात ठेवली होती. त्यातील ३८ पोते चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २२ सप्टेंबर २०२१ रोजी घडली होती. या प्रकरणात माजलगाव पोलिसांनी छडा लावून दोन आरोपींना ताब्यात घेतले. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


पात्रुड येथील शेतकरी कुलदीप इंद्रजीत शिंदे (वय ३२) या शेतकर्‍याने आपल्या पाच एकर शेतात मोठी मेहनत करून सोयाबीन पिकवली होती. शेतकर्‍याने सोयाबीन मळणी यंत्राद्वारे काढून ती शेतात ठेवली होती. पाऊस पडत असल्याने शेतात जायला रस्ता नसल्याने शेतातील एका शेडमध्ये सोयाबीनचे पोते भरून ठेवले होते. रात्री गावातीलच माजेद पाशा शेख (वय ३०), अन्वर मजीद कुरेशी (वय २१) दोन्ही रा. पात्रुड यांनी ३८ पोते सोयाबीन एका पिकअपमध्ये भरून नेल्याची घटना २१ सप्टेंबर २०२१ रोजी घडली होती. या प्रकरणी कुलदीप शिंदे यांनी माजलगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार एस.आर. ऐटवार हे करत होते. काल माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांना या आरोपींबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन अरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी वरील सोयाबीन चोरल्याचे पोलीसांना कबुली दिली. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक जोनवाल, सहायक फौजदार ऐटवार, पो.कॉ. खराडे, पो.नाईक ढोबळे, सांगळे, रफिक, भागवत शेलार यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!