Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीड३६४ हंगामी वसतिगृहांची एकाच वेळी तपासणी सुरू

३६४ हंगामी वसतिगृहांची एकाच वेळी तपासणी सुरू


बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हंगामी वसतिगृहांमध्ये नेहमीच घोटाळा होत असल्याच्या तक्रारी असतात. या अनुषंगाने आज जिल्हा परिषदेच्या वर्ग २ ते ३ च्या कर्मचार्‍यांकडून आज आणि उद्या एकाच वेळी या वसतिगृहांची तपासणी होत असून यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मोजण्यासाठी बायोमॅट्रिक मशीन, नोंदणी केलेले सर्व विद्यार्थी येतात का आणि जेवणाचा दर्जा यासह अनेक बाबींची तपासणी होणार आहे.


ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोडणीसाठी गाव सोडून जात असतात. त्यानंतर ही मुले गावातच राहतात. या मुलांची उपासमार होऊ नये आणि ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जावू नये यासाठी शिक्षण विभागाने ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृहे सुरू केली. ही वसतिगृहे ३१ मार्चपर्यंत कार्यरत असून वसतिगृहातील मुलांना शालेय शिक्षण विभागामार्फत दोन वेळचे जेवण दिले जाते. मात्र त्यातही शालेय समितीचा अध्यक्ष आणि गावातील ग्रामपंचायत पुढारी यातून पैसे कसे मिळतील याचा कावेबाजपणा करत असतात. त्यामुळे ही वसतिगृहे तपासण्याचा निर्णय दोन वर्षांपासून सुरू आहे. आजही बीड जिल्ह्यातील २६४ वसतिगृहांची तपासणी अंगणवाडी सुपरवायझर, विस्तार अधिकारी, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदींच्या मार्फत आज आणि उद्या सकाळी साडेसात ते साडेनऊ आणि संध्याकाळी साडेआठ या दरम्यान तपासणी करण्यात येऊन त्याचा अहवाल दोन दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना द्यायचा आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!