Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडसावधान! जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले

सावधान! जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले


बीड (रिपोर्टर) मुंबई, पुणेसह राज्यातील काही शहरात कोरोनाचा आकडा प्रचंड वाढताना दिसून येत असल्याने राज्य सरकारकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. अशा परिस्थितीत पाचच्या आत रुग्णसंख्या येत असलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांचा आकडा दोनअंकी होताना दिसून येत आहे. आज जिल्ह्यात १२ रुग्ण आढळले असून बीड तालुक्यात सर्वाधिक ५ रुग्णांची नोंद आहे. त्यापाठोपाठ परळी तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले आहेत. तर आष्टी २, गेवराई-पाटोदा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा सातत्याने एकअंक असायचा. हजाराच्या आसपास रोज कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा हा दोन अंकावर जावून पोहचला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल २ हजार १५७ संशयितांच्या तपासण्या केल्या असता २१४५ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे तर १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात बीड तालुक्यात सर्वाधिक ५, परळी ३, आष्टी २, गेवराई १, पाटोदा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अन्य शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. बीड जिल्ह्यातही रुग्णवाढीची सुरुवात झाल्याने नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

Most Popular

error: Content is protected !!