Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हा बँकेच्या बालेपीर शाखेत चोरांचा सुळसुळाट पैसे काढण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांच्या खिश्यावर डल्ला

जिल्हा बँकेच्या बालेपीर शाखेत चोरांचा सुळसुळाट पैसे काढण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांच्या खिश्यावर डल्ला


बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे नाही

बीड (रिपोर्टर)ः- शेतकर्‍यांचे अतिवृष्टीचे अनुदान जिल्हा बँकेमार्फत वाटप केले जात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत शेतकर्‍यांची गर्दी उसळली आहे. या गर्दीचा फायदा घेत चोरटे शेतकर्‍यांच्या खिश्यावर डल्ला मारत आहे. बालेपीर शाखेत दररोज अनेक शेतकर्‍यांच्या खिश्यातील पैसे व मोबाईल चोरीला जात आहे. बँकेने पैसे वाटप करतांना काही नियमावली लावली पाहिजे. एकाच वेळी शेतकर्‍यांची झुंड कॅशीयरच्या समोर उभी असते आणि याचाच फायदा घेवून शेतकर्‍यांच्या खिश्यातील पैसे चोरीला जात आहे.पोलीसांनीही याकडे लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा.


राज्य सरकारने शेतकर्‍यांना अनुदान घोषीत केल्यानंतर त्याचे वाटप सध्या सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच शाखेत अनुदानाचे वाटप केले जात असून त्या ठिकाणी शेतकर्‍यांची मोठी गर्दी उसळलेली असते. या गर्दीचा फायदा चोरटे उचले लागले. नगर रोडवरील बालेपीर शाखेत चोरटे दररोज शेतकर्‍यांच्या खिश्यातील पैसे आणि मोबाईल काढून घेत आहे. बँकेत सिसिटिव्ही कॅमेरे नाहीत. पैसे वाटप करतांना बँकेने कुठल्याही प्रकारची शिस्त लावलेली नाही त्यामुळे एकाच वेळी कॅशीअर समोर शेतकर्‍यांची झुंड असते. आणि अशा गर्दीचा फायदा चोरटे उठून पैसे चोरतात. चोरट्यांचा पोलीसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!