Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडअभी तो नापी है मुठ्ठी भर जमीं हमने, सारा आसमॉं अभी बाकी...

अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीं हमने, सारा आसमॉं अभी बाकी है| पदग्रणाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर धनंजय मुंडेंचे खास ट्विट


दोन वर्षातील कामकाजाचे प्रगतीपुस्तक धनंजय मुंडेंनी केले सादर
दर महिन्याला कामाचा अहवाल जनतेला सादर करणारे एकमेव मंत्री

मुंबई (रिपोर्टर) ’सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारून आज दोन वर्ष पूर्ण झाली, या काळात घेतलेल्या विविध लोककल्याणकारी निर्णयांची श्रृंखला आपल्या समोर मागील ४० दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतोच आहे. लोकसेवेचा हा अविरत वसा असाच अखंडित राहील.’ अशा शैलीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारून दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खास ट्विट केले आहे. तर काल ना. मुंडेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर या दोन वर्षाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाची कॉपी टेबल बुक स्वरुपात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह सर्व सहकारी मंत्र्यांना दिले.


या ट्विट मध्ये जिंदगी की असली उडान अभी बाकी है,
जिंदगी के कई इम्तिहां अभि बाकी है|
अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीं हमने,
सारा आसमॉं अभी बाकी है| या खास शायरीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी या दोन वर्षात केलेल्या कार्यापेक्षाही पुढील काळात आणखी खूप काही करणे अभिप्रेत असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.
दरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी दोन वर्षात विभागाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. काही योजनांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कालानुरूप बदल केले, काही नाविन्यपूर्ण योजना, दोन नवीन महामंडळे सुरू केली. काही नवीन योजना अंतिम टप्प्यात आहेत तर बर्‍याच योजना प्रस्तावित केल्या आहेत. या सर्व निर्णय प्रक्रियेतील ठळक निर्णयांचे प्रगतीपुस्तक कॉफी टेबल बुक स्वरूपात तयार करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासह सर्व पक्षश्रेष्ठींना व मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना सादर केले आहे. त्याचबरोबर या पुस्तकाची पीडीएफ कॉपी सर्व पत्रकार, तसेच जनतेच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून दिली आहे. मागील ४० दिवसांपासून ’श्रृंखला ५० लोककल्याणकारी निर्णयांची’ या सदराखाली धनंजय मुंडे यांनी दररोज एक निर्णय समाज माध्यमांवर देखील मांडला आहे. ०६ जानेवारी, २०२० रोजी सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर प्रत्येक महिन्याला आपल्या कार्याचा अहवाल पक्षश्रेष्ठी व जनतेसमोर सादर करण्याची परंपरा धनंजय मुंडे यांनी सुरू केली. ही परंपरा २ वर्ष सातत्याने अबाधित ठेवणारे एकमेव मंत्री म्हणून धनंजय मुंडे आता सिद्ध झाले आहेत. आपल्या विभागाचा कारभार पारदर्शक असावा तसेच आम्ही तिथे बसून नेमके काय करतो हे त्या विभागांतर्गत लाभ मिळवणार्‍या सर्व समाज घटकांना माहीत असावे, अशी यामागे ना. मुंडेंची भूमिका आहे.

Most Popular

error: Content is protected !!