Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeसंपादकीयमाईंनी पोरकं केलं

माईंनी पोरकं केलं


सिंधूताई सपकाळ हे नाव राज्यातील कान्याकोपर्‍यात माहित आहे. त्यांचं आयुष्य अंत्यत खडतर होतं. कमी वयात त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांचे प्रचंड हाल झाले. त्यांना सासरच्यांनी खुप त्रास दिला होता. त्या स्मशान भुमीत राहून जगल्या. तेथील अन्न खावून त्यांनी कित्येक दिवस काढले. त्यातून तावून, सुलाखून त्या, निढर होत पुढे आल्या. जीवनाला कंटाळून आत्महत्या करायला निघालेली महिला पुन्हा विचारकर्ती झाली आणि आपण जगलं पाहिजे असा ठाम विश्‍वास मनाशी बांधून त्यांनी जगण्याशी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनात जगण्याची जिद्द निर्माण झाली. त्यांनी कित्येकांना उभं केलं. ज्याचं या पृथ्वीतलावर कोणी नाही.

त्यांच्यासाठी त्या ‘माई’ झाल्या. माणसाच्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. आयुष्य कठीण असतं. कठीण प्रसंगावर जो मात करुन पुढे जात असतो. तोच इतिहास घडवत असतो. सिंधूताई यांनी इतिहास घडवला.
सिंधूताई ह्या मुळच्या विदर्भातील वर्धा येथील, आयुष्यात ज्या काही कडू गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या. त्यातून त्या संघर्षशील बनल्या. एक महिला काय करु शकते. हे सिंधूताई यांनी दाखवून दिलं. देशात अनेक अनाथ मुलं असतात. ह्या अनाथ मुलांना काही जण फेकून देतात. अशा अनाथांना मायेची उब देणार्‍या सिंधूताई होत्या, त्यांच्या पंखाखाली आता पर्यंत कित्येक अनाथ मुलं जगली आणि मोठी झाली. त्यांनी सांभाळेली मुलं मोठ, मोठ्या पदावर आहेत. एक आई इतकं करु शकत नाही, ते सिंधूताई यांनी अनाथ मुलासाठी केलं. त्याच्ंया कार्याची महती राज्यातच नव्हे तर देशात गाजत होती. त्यांची ओळख पदेशात सुध्दा होती. त्या परदेशात विविध कार्यक्रमाला हजेरी लावत होत्या. परदेशातही गेल्यानंतर त्या आपली मराठमोठी संस्कृती विसरत नसत. त्याचं बोलणं हे जणू एखाद्या कसलेल्या साहित्यीकांना पाठीमागे टाकणारं होतं. त्या बोलायला लागल्या की, वाटतं असं, त्यांनी कधी पर्यंत ही बोलत राहावं. त्यांची बोलण्याची शैली वेगळीच होती. त्याचं भाषण समोरच्या श्रोत्यांवर छाप पाडणारं होतं. एखाद्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम असला की, त्या कार्यक्रमातून आपला ‘संघर्षमय’ जीवन पट काही मनिटात उलघडवत असे, त्यांचा संघर्षमय प्रवास ऐकल्यानंतर जो तो माणुस अगदी थक्क होत असे. त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत सुध्दा बोलत होत्या. जेव्हा, जेव्हा त्या कार्यक्रमाला जात असे. तेव्हा त्याचं श्रोत्यापुढे एकच मागणं असाचयं, माझ्या ‘लेकरासाठी तुम्ही काही तरी द्या’ त्याचं भावनीक आवाहन ऐकून लोक त्यांना मदत करत होते. त्यांनी कधीच स्वत:साठी काही केलं नाही, केलं ते अनाथासाठी, त्यांच्यासाठी त्या रात्र,दिवस एक करत होत्या. मी बोलले नाही तर माझे लेकरं उपाशी राहतील असं त्या सांगत होत्या. त्यांच्या बोलण्यात माया, ममता,गोडवा होता. त्या बोलतांना संस्कार ही करत होत्या.नव्या पिढीने कसं जगलं पाहिजे, त्यांनी कोणते संस्कार आत्मसात केले पाहिजे हे ही त्या सांगत होत्या. त्या एक सेवेचा महासागर होत्या. त्यांच्यावर चित्रपट निघाला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं.’मी सिंधुताई सपकाळ’ तो चित्रपट खुपच गाजला होता. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन त्यांना केंद्र सरकारने २०२१ मध्ये पद्मश्री हा किताब दिला होता. मध्यंतरी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. इतर ही त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे. राज्याने आता पर्यंत अनेकांना घडवलं. महान नेत्यांना जन्म घालणारा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्रात सिंधूताई सपकाळ नावाचं एक समाजसेवेचा यज्ञ पेटत होता, तो यज्ञ काल विझला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रच नव्हे देश हाळहळला. सिंधूताई ह्या किती महान होत्या हे त्यांच्या कार्यातून दिसून येतं. त्यांच्या कामाची उंची मोजता येणार नाही. इतकं मोठं हे वटवृक्ष होतं. ह्या वटवृक्षाने आपल्या सावलीखाली कित्येक पिल्लांना आश्रय दिला होता. ह्या पिल्लांना सोडून वटवृक्षांने आपला जीवनपट संपवला. अनाथांना सांभाळणारी माता कायमची निघून गेली. सिंधूताईंनी महाराष्ट्राला पोरकं केलं. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली. त्यांच्या कार्याला सलाम.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!