Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमराज ठाकरेंविरोधात परळी न्यायालयाचे अटक वॉरंट जारी

राज ठाकरेंविरोधात परळी न्यायालयाचे अटक वॉरंट जारी

बीड -ऑनलाईन रिपोर्टर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळीमधील न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. येथील प्रथम वर्ग परळी वैजनाथ दिवाणी न्यायालयाने (क स्तर) हे वॉरंट जारी केलं आहे. जामीन करून देखील सतत तारखेला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येत असल्याचं न्यायलायने म्हटलं आहे.

केस क्रमांक आर. सी. सी. १४०००३८/२००९ प्रकरणी परळी वैजनाथ न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीमध्ये वारंवार जामीन दिल्यानंतरही राज ठाकरे न्यायलयासमोर हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयामध्ये या प्रकरणी महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज ठाकरे असा युक्तीवाद सुरु आहे. आरोपी हा सतत गैरहजर असल्याने आरोपीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येत आहे. पुढील सुनावणीला त्यांना न्यायालयासमोर हजर करावे असं न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलंय.

22 ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक झाली होती, याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. परळीत देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या अटकेचा निषेध केला. यादरम्यान, कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पॉइंट येथे दगडफेक केली. दगडफेकीत बसच समोरील काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.

काय आहे प्रकरण –
मुंबईमध्ये राज ठाकरे यांना ऑक्‍टोबर 2008 ला अटक करण्यात आले होते या घटनेचा परिणाम राज्यभर उमटला होता. या अटकेच्या विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड झाली होती. बसेसवर दगडफेक झाली होती, असाच प्रकार परळी मध्ये सुद्धा घडला होता. धर्मापुरी पॉईंट येथेसुद्धा एसटी बसेसवर दगडफेक झाली होती, ज्यामध्ये एसटीचे नुकसान झाले होते.या घटनेनंतर जमावबंदी आदेश मोडणे.. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व चिथावणीखोर वक्तव्य करण्यात या कारणावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यादरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते परळी पोलीस ठाणे सुद्धा या प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

Most Popular

error: Content is protected !!