Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडहॉटेल चालकास मारहाण करून गळ्यातील चेन हिसकावली दहा जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात...

हॉटेल चालकास मारहाण करून गळ्यातील चेन हिसकावली दहा जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर) तुला हॉटेल चालवायचे असेल तर मला पंधरा हजाराचा हप्ता दे म्हणत हॉटेल चालकाला बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठी काढून घेत ऍट्रॉसिटीची धमकी दिल्याची घटना आष्टीत घडली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सतीश बाबासाहेब धस (रा. जामगाव ता. आष्टी) यांचे आष्टी शहरात सहारा हॉटेल आहे. तेथे जेवणासाठी आलेल्या लोकांना हॉटेल मालकाने जेवणाचे बील मागितल्यानंतर ‘आम्ही दादा आहोत, तुला या भागात हॉटेल चालवायचे असेल तर आम्हाला पंधरा हजार रुपयांचा हप्ता दे’, असे म्हणत हॉटेल चालकाला दहा जणांनी बेदम मारहाण केली. संदीप पवळे याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने हॉटेल मॅनेजरला जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. या वेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या लोकांनाही आरोपीने गंभीर मारहाण केली. संदीप पवळे याने तुला येथे हॉटेल चालवायचे असेल तर माझ्या बापाकडे पंधरा हजार रुपयाचा हप्ता दे, अन्यथा तू हॉटेल कशी चालवतो तेच बघतो, तु जर पोलिसात तक्रार केली तर तुझ्या विरोधात मी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेल व तुला जिवे मारील, अशी धमकी देत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली. या प्रकरणी आष्टी पोलिसात संदीप ऊर्फ दादा दिलीप पवळे, सतीश ऊर्फ मुन्ना संदीप पवळे, हादी जंजीरसिंग बावरे, शुभम बाबासाहेब बाल्हेरकर, राजू वाघमारे (रा. फुलेनगर आष्टी) व इतर तीन ते चार अनोळखी इसमांविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात कलम ३०७, ३२६, ३२५, ३८५, ३२७, ३२३, ५०४ ५०६, १४३, १४७, १४८, १४९ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!