Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमशिक्षकाचा बळजबरीने व्हिडिओ बनवून बलात्काराची धमकी देत मागितले दहा लाख

शिक्षकाचा बळजबरीने व्हिडिओ बनवून बलात्काराची धमकी देत मागितले दहा लाख


महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर)- शिक्षकाशी ओळख करून त्यानंतर इतरांच्या संगनमताने त्याला जबर मारहाण करत बळजबरीने त्याचा व्हिडिओ बनवून दहा लाखांची मागणी करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना धारूरमध्ये घडली असून या प्रकरणी शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून एका महिलेसह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बाजीराव घनश्याम चौरे (वय ३४ वर्षे, व्यवसाय शिक्षक, जिल्हा परिषद शाळा मांगवडगाव ता. केज जि. बीड, रा. तुकुचीवाडी ता. केज) यांनी धारूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या शाळेवर मोहिनी बप्पासाहेब भांगे रा. डोका ता. केज या कोरो संस्थेच्या माध्यमातून येत होत्या. त्यावेळी बाजीराव चौरे या शिक्षकासोबत मोहिनी भांगे हिने ओळख करून घेतली. त्यानंतर दि. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी मोहिनी ही शिक्षक चौरे यांना धारूर येथे तिच्या मैत्रीनीला भेटायचे आहे, असे म्हणून मित्राच्या गाडीत घेऊन गेली. त्यानंतर गाडीत मोहिनीचा मित्र अशोक मिसाळ आणि इतर चार ते पाच अनोळखी इसमांनी शिक्षकाला मारहाण करत बळजबरीने मोहिनी भांगेच्या बाजुला बसवले आणि मोहिनीस मिठी मार, तिला किस कर तसेच माझे मोहिनीवर प्रेम आहे, आणि आमचे शारीरिक संबंध आहेत, असे म्हणायला लावत बळजबरीने व्हिडिओ बनविला व हे प्रकरण मिटवायचे असेल तर आम्हाला दहा लाख रुपये दे अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाकल करून तुला आयुष्यभर जेलमध्ये टाकू, अशी धमकी दिली. या प्रकरणी शिक्षकाने धारूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मोहिनी बप्पासाहेब भांगे व अशोक मिसाल आणि इतर तीन ते चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यूसुफवडगाव, केजमध्येही या टोळीने अनेकांना फसवले
अंबाजोगाई येथे दवाखान्यात नातेवाईकांना भेटायला जायचे आहे, असे म्हणून केज येथील गॅरेज मालक सुग्रीव बसवर यांची गाडी भाड्याने घेऊन केज-चंदनसावरगाव-होळ मार्गावर गाडी रस्त्यात थांबवून चालकाला बेदम मारहाण करत त्याला त्याच्या खात्यातील अकरा हजार रुपये स्वत:च्या खात्यात टाकायला लावले तसेच त्याला मित्रांकडून ५० हजार रुपये घेऊन त्यांच्या खात्यात टाकून घेत गंडवले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!