Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईम५० टक्के वाटा मागणारा ग्रामसेवक गजाआड, ३० हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहात...

५० टक्के वाटा मागणारा ग्रामसेवक गजाआड, ३० हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले, आज सकाळची घटना



बीड (रिपोर्टर):ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी जी डागडुजी करण्यात आली त्याचे बील पास करण्यासाठी ग्रामसेवकाने ५० टक्के वाटा मागितला. लाचखोर ग्रामसेवक हा त्रास देत असल्याचे पाहून एसीबीकडे तक्रार केली असता आज सकाळी ५० टक्क्याचा वाटा मागणार्‍या ग्रामसेवकास ३० हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडून त्याच्या मुसक्या बांदल्या. सदरची कारवाई ही आष्टी तालुक्यात आज सकाळी करण्यात आली.


आष्टी तालुक्यातील वेलतुरी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक सय्यद शकील सय्यद जमादार (वय ४०) रा.धामणगाव ता.आष्टी याने कामाचे बिल काढण्यासाठी त्यातील ५० टक्के वाटा मागितला होता. या प्रकरणी फिर्यादीने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दि.२३-१२-२०२१ रोजी तक्रार दिली होती. या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने त्याची पडताळणी करून सापळा लावला असता तिस हजार रुपये लाच घेताना ग्रामसेवक सय्यद शकील सय्यद जमादार याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई औरंगाबाद पोलीस अधिक्षक डॉ.राहूल खाडे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली डि.वाय.एस.पी. भारत राऊत, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, श्रीराम गिराम, गणेश म्हेत्रे यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!