अंबाजोगाई (रिपोर्टर)- अंबाजोगाई :तालुक्यातील पोखरी शिवारात सोयाबीनच्या ढिगार्यासह 60 वर्षीय महिला काशीबाई निकम यांचा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचे जवळपास निष्पन्न झाले असून याप्रकरणी एका 42 वर्षीय सवशीयत आरोपीला पोलिसांनी गजाआड केले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे
या बाबत प्राप्त माहिती अशी की यातील आरोपीने काशीबाई निकम यांच्याकडून मोठी रक्कम हात उसण्या स्वरूपात घेतली होती मात्र सांगितलेल्या वेळी त्याने रक्कम परत दिली नसल्याने काशीबाईने त्याच्याकडे तगादा लावला होता त्याने रक्कम परत न करता काशीबाई ला कायमचे सम्पविण्याचा निर्णय घेऊन काशीबाई चा गळा घोटून जीवे मारले व मृतदेह पुन्हा जाळून टाकले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न होत असून प्रकरणी आज सायंकाळी पोलीस प्रशासन पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती देणार असल्याचे समजते.