Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडनारी सशक्तीकरणाला परवानगी द्या, काकुंचे पुत्र म्हणून अभिमान -जयदत्त क्षीरसागर

नारी सशक्तीकरणाला परवानगी द्या, काकुंचे पुत्र म्हणून अभिमान -जयदत्त क्षीरसागर


बीड (रिपोर्टर)- जिजाऊ मॉ साहेब, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, केशरकाकू, सिंधूताई सपकाळ यांनी संघर्ष करत आपआपल्या कार्यकाळामध्ये महिलांचे सशक्तीकरण केले. आता नुसती चर्चा होते, नारी सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्याची नितांत गरज असल्याचे सांगत कुठलाही वसा आणि वारसा नसताना ७०-८० च्या दशकात काकुंनी जे काम केलं लोकहिताला महत्व दिलं, त्यांचे पुत्र असल्याचा अभिमान वाटतो, असं म्हणत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ज्यांना आधार नाही त्यांचा आधार बनण्याचं काम बीड नगरपालिकेने केले, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.
ते बीड येथे आयोजीत सौ. केशरकाकू महिला बचत गट मॉलच्या शुभारंभ व उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, दिपाताई क्षीरसागर, चंद्रकला बांगर, उषा सरवदे, भोपळे उज्वला, डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आज सकाळी बीड येथे सौ. केशरकाकु महिला बचत गट मॉलचे उद्घाटन भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, नारी सशक्तीकरणाच्या नुसत्या गप्पा मारून जमणार नाही तर नारी सशक्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत. बीड नगरपालिका असाच खारीचा वाटा उचलत आहे. सध्या बीड सर्व अर्थाने गाजत असल्याचे सांगून ज्यांना आधार नाही त्यांचा आधार बनण्याचे काम बीड नगरपालिकेने केले आहे हे कौतुकास्पद आहे. सध्या शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकतय याला महत्व असल्याने मार्केटिंगचा विषय अधिक महत्वाचा असल्याचे सांगून महिला बचत गटांसाठी आणि त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी गजानन नागरी सहकारी बँक पुढे आली आहे. अधिका अधिक महिला बचत गटांना करा, असेही त्यांनी या वेळी सांगितले. रेशीम उद्योग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त रेशीमचं उत्पादन बीड जिल्ह्यात होत असल्याने इथे रेशीमचं सुत निर्माण करण्यासाठी भविष्यात गिरणी उभारण्याचं काम करू, असेही ते या वेळी म्हणाले.

Most Popular

error: Content is protected !!