Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडचौसाळ्यात इलेक्ट्रीक दुकान फोडले ९० हजाराचा माल पळविला

चौसाळ्यात इलेक्ट्रीक दुकान फोडले ९० हजाराचा माल पळविला


चौसाळा (रिपोर्टर) चौसाळा येथील एका इलेक्ट्रीक दुकानाच्या शटरचा कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील ९० हजार रुपयांचे इलेक्ट्रीक साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी दुकान मालकाने पोलिसात तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महंमद अनिस यांच्या मिलन इलेक्ट्रीक दुकानामध्ये चोरी झाली. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शटरचा कोंडून तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील दोन होम थिएटर, वायर यासह इतर अन्य साहित्य असा एकूण ८० ते ९० हजार रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी महंमद अनिस यांनी पोलिसांकडे तक्रार देखील त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!