Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडपाच राज्यांच्या निवडणुकांची आज घोषणा

पाच राज्यांच्या निवडणुकांची आज घोषणा


नवी दिल्ली (वृत्तसेवा) कोरोना महासाथीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना महासाथीत निवडणुका होाणार असल्याने निवडणूक आयोगाकडून काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.


निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मागील काही दिवसांपासून निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सातत्याने बैठका सुरू आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासह आयोगाकडून प्रचार सभा, रॅली यांच्याबाबत काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

Most Popular

error: Content is protected !!