Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हा दूध संघासाठी आज मतदान झाले निकालापूर्वीच शुभेच्छांचे बॅनर लागले!

जिल्हा दूध संघासाठी आज मतदान झाले निकालापूर्वीच शुभेच्छांचे बॅनर लागले!


बीड (रिपोर्टर) बीड येथील शासकीय जिल्हा दूध संघाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून गेल्या महिनाभरात शेतकरी दूध उत्पादक पॅनल आणि शेतकरी विकास पॅनल या दोघांनी या निवडणुकीत मोठा प्रचार केला. या संघासाठी एकूण ४८ मतदान असून ते सर्वचे सर्व मतदारांनी आज मतदान केले. मात्र निकालापुर्वीच बीड तालुक्यातील बालाघाटावर स्वाभिमानी शेतकरी दूध उत्पादक पॅनलला अभिनंदन आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


जिल्हा दूध संघाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. एक महिन्यापासून या दूध संघाच्या निवडणुकीची लगबग दिसून येत होती. या दूध संघासाठी स्वाभिमानी शेतकरी दूध उत्पादक पॅनल आणि शेतकरी विकास पॅनल हे आमने-सामने लढत होते. एकूण ४८ मतदार असलेल्या या संघासाठी मतदान प्रक्रिया आज सुरू असून दुपारी एक वाजेपर्यंत ४८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मात्र निकालापुर्वीच बालाघाटावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचे बॅनर लागल्याने सदरची निवडणूक ही एकतर्फी होण्याचे चिन्हे दिसून येत आहेत. बालाघाटावर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये स्वाभिमानी शेतकरी दूध उत्पादक पॅनलला अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!