Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडपरळीत लाखोंचा गुटखा पकडला पंकज कुमावतांच्या पथकाची सौंदाण्यात कारवाई

परळीत लाखोंचा गुटखा पकडला पंकज कुमावतांच्या पथकाची सौंदाण्यात कारवाई


परळी (रिपोर्टर) सर्वत्र गुटखा विक्री राजरोसपणे सुरु असुन जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीसांचे धाडसत्र सुरू आहे. या अनुषंगाने सौंदणा ता.अंबाजोगाई येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये साठा करून ठेवलेला लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात नेमणूकी वरील पोलिस हवालदार बालाजी शेषराव दराडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार आरोपी गोविंद संदिपान उद्रे (वय २३) रा.सौंदणा याच्या राहत्या घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये विविध प्रकारचा गुटखा साठा करून ठेवलेला आढळून आला.राज्यात गुटखा बंदी असतानाही बेकायदेशीररित्या साठा जवळ बाळगुन चोरटी विक्री करण्यासाठी ३ लाख २९ हजार ६२० किंमतीचा गुटखा माल आढळून आला. अधिक चौकशी केली असता हा माल बसवकल्याण (कर्नाटक) येथुन आणल्याची माहिती आरोपीकडून मिळाली.या प्रकरणी आरोपी गोविंद संदिपान उद्रे (वय २३) रा.सौंदणा व बसवकल्याण (कर्नाटक) दुकान नंबर ५ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संतोष मिसळे, पो.हे.कॉ. बालाजी दराडे, पो.नाईक राजू वंजारे, दिलीप गित्ते, महादेव बहिरवाल, संजय तुले यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि मुंडे हे करीत आहेत

Most Popular

error: Content is protected !!