Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडबीडमध्ये दहा तर जिल्ह्यात २६ पॉझिटिव्ह

बीडमध्ये दहा तर जिल्ह्यात २६ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर) तिसर्‍या लाटेत महाराष्ट्रासह देशात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बीडमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये आकडा हळूहळू वर चालला आहे. कालच्या अहवालात कोरोनाचे १६ रुग्ण आढळून आले आहे तर आजच्या अहवालात तो आकडा तब्बल २६ वर गेला आहे. यामध्ये बीड तालुक्यात १० रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाने काल १७३७ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यामध्ये १७११ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ४, आष्टी १, बीड १०, धारूर २, गेवराई १, केज २, माजलगाव १, परळी ३ आणि शिरूर तालुक्यात २ रुग्ण आढळून आले आहेत. काल बीड जिल्ह्यातून ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कालपर्यंत जिल्ह्यात ऍक्टीव्ह रुग्ण ७२ होते त्यात आजच्या २६ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ऍक्टीव्ह रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढत चालला आहे.

Most Popular

error: Content is protected !!