Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडलस न घेतलेल्यांना तिसर्‍या लाटेचा सर्वाधिक धोका, ऑक्सिजन बेडवरचे नव्वद टक्के रुग्ण...

लस न घेतलेल्यांना तिसर्‍या लाटेचा सर्वाधिक धोका, ऑक्सिजन बेडवरचे नव्वद टक्के रुग्ण लस न घेतलेले


बीड (रिपोर्टर) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि आरोग्य विभाग एकीकडे प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे बाधीत आढळलेल्या रुग्णांमध्ये लस न घेतलेले मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत तर ज्या रुग्णांना ऑक्सीजनची गरज भासत आहे त्यामध्ये ९० टक्के रुग्ण हे लस न घेतलेले दिसून आल्यामुळे तिसर्‍या लाटेचा धोका लस न घेतलेल्या नागरिकांना सर्वाधिक असल्याचे यामध्ये उघड होत आहे. बीड जिल्ह्यात लस न घेतलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण हा उपाय आहे मात्र अद्यापही काही नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. मुंबई, पुणेसह राज्यातील अन्य शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात अनेक रुग्ण ऑक्सीजनवर गेले आहेत. राज्यात जेवढे रुग्ण सध्या ऑक्सीजनवर आहेत त्यामध्ये ९० टक्के रुग्णांनी लस न घेतल्याचे दिसून आले आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त एकबालसिंह चहल यांनी मुंबईमधील रुग्णांबाबत माहिती देताना लस न घेतलेल्या नागरिकांना तिसर्‍या लाटेचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले. गेल्या महिनाभरापुर्वी बीड जिल्ह्यातह लसीकरणाचा टक्का घसरलेला होता. लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दारोदारी लस देण्याचा उपक्रमही राबविला मात्र अद्यापही जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले नाही. गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येऊ लागले असून रोज रुग्णसंख्याही दीड ते दोन पटीने वाढताना दिसून येत आहे. त्यात अनेकांचे लसीकरण झालेले नाही. ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही अशांना संसर्गाची सर्वाधिक भीती असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

Most Popular

error: Content is protected !!