Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडमुलांना आयुर्वेदिक डोस पाजण्याचा अधिकार सेवाभावी संस्थांना कुणी दिला?

मुलांना आयुर्वेदिक डोस पाजण्याचा अधिकार सेवाभावी संस्थांना कुणी दिला?


आरोग्य विभागाने चौकशी करून कारवाई करावी

बीड (रिपोर्टर) बीड शहरातील जुना धानोरा रोड परिसरातील अनेक बालकांना जय जगदंबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने काही महिलांनी आयुर्वेदिक डोस पाजले. हे आयुर्वेदिक डोस पाजण्याचा अधिकार संस्थेला कोणी दिला? असा प्रश्‍न उपस्थित होत असून याप्रकरणी या संस्थेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बीड शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून काही संस्था मुलांना आयुर्वेदिक डोस पाजतात. या संस्थेच्या वेगवेगळ्या आमिषाला पालक बळी पडतात आणि आपल्या मुलांना हे डोस पाजत असतात.

विशेष करून या संस्थेच्या कर्मचार्‍याकडे कसलेही शासनाचे अधिकृत परिपत्र नसते किंवा तसे आदेशही नसतात तरीही हे कर्मचारी लोकांना भूलवून मुलांना डोस पाजतात. या डोसची किंमत ६० रू. इतकी आहे. आज सकाळी जय जगदंबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जि.औरंगाबाद यांच्यावतीने शहरातील जुना धानोंरा रोड परिसरात अनेक मुलांना आयुर्वेदिक डोस पाजण्यात आले आहेत. याबाबत काही पालकांनी संस्थेच्या कर्मचार्‍यांशी याबाबत अधिक विचारपुस केली असता त्यांनी काढता पाय घेतला. दरम्यान अशा फसव्या डोस पाजणार्‍याविरोधात आरोग्य विभागाने कारवाई करावी आणि नागरिकांनीही दक्षता घेत शासकीय कर्मचार्‍याव्यतिरिक्त इतरांकडून कसल्याही प्रकारचे डोस आपल्या मुलांना पाजू नयेत.

Most Popular

error: Content is protected !!