Friday, January 28, 2022
No menu items!
Homeकोरोनादहावी आणि बारावीच्या वर्गाबाबत संदिग्धता कायम

दहावी आणि बारावीच्या वर्गाबाबत संदिग्धता कायम


बीड (रिपोर्टर) राज्यशासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत इतर निर्बंधासह राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद केलेले आहेत. सरकारच्यावतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या शासन आदेशामध्ये इ.दहावी आणि बारावीसाठी शिक्षणमंडळाने विविध उपक्रम राबवावेत असे सांगतानाच त्यांचे वर्ग सुरू ठेवावे का नाही ठेवावे?, त्यांच्या क्लासेसबाबतही काहीही शासन आदेशात अद्याप म्हटलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकात गोंधळ उडालेला आहे.


राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश काढत कोणते व्यवहार चालु आणि कोणते बंद? याबाबत सविस्तर आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिलेले आहेत. त्यातील आदेशानुसार इ.दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणमंडळाने, परिक्षा घेणार्‍या बोर्डाने विविध उपक्रम राबवावेत असेही म्हटले आहे. मात्र याबाबत सविस्तरपणे कोणताही खुलासा केलेला नाही. जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनाही याबाबत सायं.दै.बीड रिपोर्टरने विचारले असता त्यांनीही याबाबत आम्हाला अद्याप स्पष्टपणे काहीही सुचना आल्या नाहीत. काही शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना कालच भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून शाळा बंद असल्याचा निरोप दिला आहे. वस्तीगृहही बंद केलेले आहेत. मात्र या मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवावेत इतकीच टिप्पणी करून याबाबत सविस्तर खुलासा कोणताही केलेला नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत. आताच महिना दिड महिनाभरापूर्वी कशातरी अर्धवट शाळा सुरू झाल्या होत्या. त्यातच पून्हा १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवल्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या या विद्यार्थ्यांचे करिअर बरबाद होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकातही मोठा गोंधळ उडालेला आहे. हा गोंधळ जिल्हा प्रशासनाने, शिक्षण विभागाने दूर करावा अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!