Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआटा मिलमध्ये येणारा राशनचा गहू पोलिसांनी पकडला, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त; बीड...

आटा मिलमध्ये येणारा राशनचा गहू पोलिसांनी पकडला, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त; बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई


बीड (रिपोर्टर) राशनचा माल एका आयशर टेम्पोत भरून तो बीड येथील ओमप्रकाश तोतला यांच्या मिलमध्ये जात असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लक्ष्मी चौकात सापळा लावून आयशर टेम्पो ताब्यात घेतला. यावेळी दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई बीड ग्रामीण पोलिसांनी रात्री साडेचार वाजता केली.


गोरगरिबांचा राशन काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात जात आहे. माजलगाव येथून राशनने भरलेला एक टेम्पो बीडकडे येत असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी लक्ष्मी चौकात चेकिंग सुरू केली असता एम.एच. २३ ए.यू. ११२२ हा टेम्पो त्यांना संशयीत वाटला. पोलिसांनी टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये राशनचा गहू मिळून आला. याबाबत चालकाला विचारपूस केली असता त्याच्याकडे कुठलेही कागदपत्र आढळून न आल्याने पोलिसांनी तो टेम्पो ठाण्यात आणून लावला. या वेळी चालक कुंडलिक लोखंडे आणि दत्ता साठे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी माजलगावमधून राशनचा गहू भरला असून तो बीड शहरातील बलभीम चौक येथील ओमप्रकाश तोतला यांच्या मिलमध्ये नेणार असल्याचे सांगितले. ग्रामीण पोलिसांनी याबाबत बीड तहसीलदार यांना पत्र दिले असून ते आल्यानंतर या प्रकरणाची पुढील कारवाई होणार आहे. सदरील कारवाई बीड ग्रामीण ठाण्याचे प्रमुख संतोष साबळे, एपीआय योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पवनकुमार राजपूत, पो.नाईक किशोर राऊत, दादासाहेब सानप, चालक कृष्णांत बडे यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!