Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडचायनिज मांजा विक्रेत्यावर गुन्हा

चायनिज मांजा विक्रेत्यावर गुन्हा


बीड (रिपोर्टर) किराणा दुकानात चायनीज मांजा विकत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून किराणा दुकानदाराविरोधात शिवाजीनगर पोलसी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


बालेपीर भागातील मुजाहिद कुरेशी अशफाक अहमद (वय ४६) हे आपल्या किराणा दुकानातून चायनीज मांजा विकत असल्याची माहिती पो.कॉ. कुमार काळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या दुकानात छापा मारला असता मांजाचे दहा बंडल त्यांना मिळून आले. पोलिसांनी ३ हजार रुपये किंमतीचे सदरील १० बंडल जप्त करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पीएसआय दराडे, चव्हाण, आगलावे, यमगर यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!