Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडसंक्रात कोणावर? काका की पुतण्यावर, नगराध्यक्षांची सुनावणी पुढे ढकलली; आता कॅबिनेट मंत्र्यांसमोर...

संक्रात कोणावर? काका की पुतण्यावर, नगराध्यक्षांची सुनावणी पुढे ढकलली; आता कॅबिनेट मंत्र्यांसमोर होणार १४ ला सुनावणी


बीड (रिपोर्टर) बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पदाचा दुरुपयोग व गैरव्यवहार केल्या प्रकरणी आ. संदीप क्षीरसागर यांनी अपात्र करण्याबाबतची तक्रार राज्य शसानाकडे दाखल केली. या प्रकरणी आज नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार होती मात्र आता हे प्रकरण नगरविकास कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वर्ग झाल्याने या प्रकरणाची सुनावणी १४ जानेवारी रोजी होणार आहे.


याबाबत अधिक असे की, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पदाचा दुरुपयोग करून गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्यांना अपात्र करण्याबाबत तक्रार बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी केली होती. सदरचे प्रकरण नगरविकास कॅबिनेटमंत्र्यांकडून नगरविकास राज्यमंत्र्यांकडे वर्ग करण्यात आलं होतं. प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय राजकीय हेतुने असल्याचे अध्यक्षांचे म्हणणे होते. या प्रकरणी डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती आणि सदरचे प्रकरण नगरविकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणीसाठी ठेवण्यास हरकत नसल्याचे म्हटले होते. आज दहा जानेवारी रोजी नगरविकास राज्यंमत्री प्राजक्ता तनपुरे यांच्यासमोर सुनावणी होण्याअगोदरच हे प्रकरण पुन्हा राज्याचे नगरविकास कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वर्ग झाल्याने आजची सुनावणी पुढे ढकलली असून सदरची सुनावणी ही १४ जानेवारी रोजी होणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!