Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडघरकुलाचा रोहयोचा शेवटचा हप्ता लाभार्थ्यांना मिळेना

घरकुलाचा रोहयोचा शेवटचा हप्ता लाभार्थ्यांना मिळेना


पैसे जातात तरी कुठे? अधिकारी, कर्मचारी म्हणतात तांत्रीक अडचण


बीड (रिपोर्टर)ः-पंतप्रधान आवास योजना, आणि रमाई घरकूल योजनेतअंतर्गत गेल्या वर्षभरात जिल्हाभरातील शेकडो लाभार्थ्यांना घरकूल देण्यात आले. या घरकूलाचे दोन हप्ते संबधीतांच्या खात्यावर जमा झाले. रोहयो अंतर्गतचा 18 हजाराचा हप्ता 99 टक्के लाभार्थ्यांना मिळाला नाही. हा हप्ता का मिळाला नाही असा प्रश्‍न उपस्थित होत असून याबाबत अधिकारी, कर्मचार्‍यांना विचारपूस केले असता ते म्हणतात तांत्रीक अडचणीमुळे हप्ता लाभार्थ्यांना मिळाला नाही. नेमकी तांत्रीक अडचण आहे तरी काय? असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे.
दरवर्षी बीड जिल्ह्यातील शेकडो लाभार्थ्यांना घरकूलाचे वाटप होते. घरकूलासाठी 1 लाख 20 हजार, अधिक 18 हजार रुपये असे 1 लाख 38 हजार मिळतात. गेल्यावर्षी त्यांना घरकूल मंजूर झाले होते. त्यासर्वांना 1 लाख 20 हजार रुपये प्राप्त झाले. मात्र रोजगार हमीतून जे 18 हजार रुपये मिळायला हवे होते ते 99 टक्के लाभार्थ्यांना मिळाले नाहीत. हे पैसे का मिळाले नाहीत याबाबत काही लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे विचारपूस करण्यात सुरूवात केली असता. कर्मचारी तांत्रीक बाबीचं कारण देत आहे. नेमकी तांत्रीक बाब आहे तरी काय? असेल तर ती का सोडवली जात नाही असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!