Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडबालाघाटावर बिबट्याची वर्दी,उदंड वडगाव शिवारात रात्री वगारीवर हल्ला

बालाघाटावर बिबट्याची वर्दी,उदंड वडगाव शिवारात रात्री वगारीवर हल्ला


पंचक्रोशीत भीतीचे वातावरण; वनविभागाने दखल घेण्याची मागणी
मांजरसुबा,दि.2(प्रतिनिधी)-बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील सुदाम चव्हाण यांच्या वगारीला बिबटयाने मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता पकडले.परंतु बंकट स्वामी नगर वासियाच्या सतर्कते मुळे मोठा अनर्थ टळला.

q12


गावाच्या शिवारात अनेकांना या श्वापदाचे दर्शन घडले आहे. मागील दोन दिवसापासून या बाबतबीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील सुदाम चव्हाण यांच्या वगारीला बिबटया ने रात्री पकडले बंकट स्वामी नगर वासियाच्या सतर्कते मुळे अनर्थ टळला अनेकांनी पुष्टी दिली होती परंतु कोणी गंभीरतेने घेतले नाही. शेवटी मंगळवारी रात्री बिबटयाने हल्ला करून या चर्चेला पूर्णविराम आणि त्याच्या अस्तित्वाचा पुरावा दिला.उदंड वडगाव तहत बंकट स्वामी नगर वस्तीवर सुदाम दशरथ चव्हाण हे मंगळवारी रात्री आपल्या कोट्यासमोर म्हशी व वगारीला बांधून ओट्यावर झोपले होते. सव्वा अकराच्या सुमारास शेतातील पिकात घात लाऊन बसलेल्या बिबट्याने वगारीवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्लाने जनावरांनी एकच कल्ला केला त्यामुळे सुदाम चव्हाण जागे झाले आणि त्यानी आरडाओरड केली. त्यामुळे वस्तीवरील लोक जागे झाले. लोकांचा आवाज ऐकून बिबटयाने वगारीला सोडून पूर्वेला नदीच्या दिशेने पळ काढला. बुधवारी सकाळीही काही ग्रामस्थांना त्याचे दर्शन झाले आहे.

अनेकांच्या भिजवलेल्या शेतात त्या बिबटयाचे ठसे दिसून येत आहेत.त्यामुळे ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी सरपंच राजेश पांचाळ,तलाठी राऊत,ग्रामसेवक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. वनविभागाला याची कल्पना दिली आहे, असे राजेश पंचाळ यांनी सांगितले. वनविभागाने याची दखल घेऊन या बिबट्याचा मोठा अनर्थ घडण्याआधी बंदोबस्त करावा अशी मागणी शंकर चव्हाण यांनी केली आहे.


वनविभागाच्या मदतीला पुण्याची रायफल टीम आष्टीत
पारगाव जोगेश्वरी येथे महिलेची हत्या केल्यानंतर नरभक्षक बिबटया या भागात दबा धरून बसल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. या बिबट्याला शोधण्यासाठी पुणे येथील राणाज रायफल क्लबची टीम मदतीला आली असून ती या भागात बिबट्याचा वावर शोधणार आहे.
29 नोव्हेंबर रोजी पारगाव जोगेश्वरी येथे बिबट्याने सुरेखा भोसले या महिलेवर हल्ला करून ठार केल्यानंतर वन विभाग या बिबट्याचा शोध घेत आहे.तीन दिवस उलटून गेले पण बिबट्याचा तपास वन विभागाला लागत नाही .या सर्व टीम गावकरी ,पथके यांना गुंगारा हा बिबट्या देत आहे.आता या बिबट्याला शोधण्यासाठी पुण्याहून राणाज रायफल क्लबचे संचालक डॉ चंद्रकांत मंडलिक यांच्यासह टीम पारगाव येथे दाखल झाली आहे.या टीम ने यापूर्वी बिबट्याच्या शोध मोहिमेसाठी काम केले असून विशेषतः रात्रीच्या वेळी बिबट्याचा माग काढण्यात ही टीम एक्सपर्ट असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ यांनी सांगितले. आजूबाजूच्या गावांनी दक्ष राहण्याचे आवाहन शिरसाठ यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!