Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमकेवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने डॉक्टरला फसवले

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने डॉक्टरला फसवले


बीड (रिपोर्टर) मोबाईल नंबरवर एक लिंक पाठवून त्याद्वारे केवायसी अपडेट करा असे म्हणत एका डॉक्टर महिलेची एक लाखाची फसवणूक केल्याची घटना 9 जानेवारी रोजी घडली असून याप्रकरणी पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किर्ती कांतीलाल शहा (वय 39, रा.रविवार पेठ बीड) असे फसवणूक झालेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. त्यांच्या मोबाईलवर नंबरवर केवायसी अपडेट करा असा मेसेज 9 जानेवारी रोजी आला होता. त्यावरून त्या केवायसी अपडेट करत असताना मोबाईलवर एक ओटीपी आला, त्यांनी त्या ओटीपीची खात्री न करता तो ओटीपी टाकला असता त्यांच्या अकाऊंटवरून एक लाख रूपये कपात झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पेठ बीड पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडून केवायसी अपडेट करण्यासाठी कुठलाही मेसेज पाठवला जात नाही. नागरिकांनी केवायसी अपडेट करण्यासाठी थेट बँकेज जावे, मोबाईलवर आलेल्या कोणत्याही लिंक ओपन करू नये.

Most Popular

error: Content is protected !!