Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमगेवराई तालुक्यात कॅनॉल वरील मोटार चोरी नंतर आता सोलार पंप चोरणारी टोळी...

गेवराई तालुक्यात कॅनॉल वरील मोटार चोरी नंतर आता सोलार पंप चोरणारी टोळी सक्रिय


पांढरवाडी येथील शेतकर्‍यांच्या दोन पंपावर चोरट्यांचा डल्ला
गेवराई (रिपोर्टर) गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून चोरट्यांनी कॅनॉल वरील विद्युत पंप चोरी नंतर आपला मोर्चा आता सोलार पंपाकडे वळवला आहे. एकीकडे नैसर्गिक संकटाने हैराण झालेल्या शेतकर्‍यांची मात्र या चोरट्यांनी झोप उडवली असून पोलीस प्रशासनाने लक्ष घालून या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांतुन होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गेवराई तालुक्यात अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांच्या विद्युत पंप चोरीच्या घटना घडत असताना मागील महिन्यातच डी.बी. पथकप्रमुख सपोनि साबळे यांनी कॅनॉल वरील विद्युत पंप चोरणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता. मात्र यानंतर आता तालुक्यात पुन्हा सोलार पंप चोरणारी टोळी सक्रिय झाली असून त्यांनी अनेक शेतकर्‍यांच्या सोलार पंपावर डल्ला मारला आहे. यातील काहींनी तक्रारी केल्या नसल्या तरी दोन दिवसांपूर्वी गेवराई शहरानजीक असलेल्या पांढरवाडी येथील रामभाऊ महादेव जाधव यांच्या शेतातील दोन बोअर मधील मोटार व केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान यामध्ये दोन मोटार व केबलसह एकूम 75 हजार रुपयाचा ऐवज लंपास करून त्याठिकाणी असलेल्या पाईपाची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नूकसान केले आहे.


याबाबत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून या घटनेचा तपास पो.हे.कॉ.सिद्दिकी हे करत आहेत. परंतु या घटनेने शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण पसरले असून या थंडीच्या काळात शेतकर्‍यांना आपल्या शेतात मुक्काम करून या पंपाची राखन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वारंवार सुरू असलेल्या या पंप चोरी प्रकरणी गेवराई पोलिसांनी लक्ष घालून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
चरक्षशशव

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!