Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeनांदेडआमदार रत्नाकर गुट्टेंच्या अडचणी वाढल्या

आमदार रत्नाकर गुट्टेंच्या अडचणी वाढल्या

ईडीने 255 कोटी रुपयांंची मालमत्ता घेतली ताब्यात

बीड (रिपोर्टर) गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे अडचणीत आले आहेत. ईडीने राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेतली आहे. ताब्यात घेण्यात आलेली ही मालमत्ता यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये गुट्टे यांच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने जप्त केली होती. ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे 255 कोटी रुपये आहे.
गुट्टे यांच्यावर ईडीने 635 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये त्यांनी विविध गरीब शेतकर्‍यांच्या नावे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची फसवणूक केली होती. घेतलेले कर्ज एका योजनेंतर्गत होते. ज्यामध्ये बँकांनी ऊस लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना शेतीसाठी उपकरणे, बियाणे, खते, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज दिले होते. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गुट्टे यांनी इतर काही जणांसोबत मिळून शेतकर्‍यांच्या कागदपत्रांचा वापर करून गंगाखेड शुगर या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या नावावर कर्ज काढले आणि तब्बल 635 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बँकांकडून घेतलेली कर्जे 2012-13 आणि 2016-17 दरम्यान होती. ही कर्जे वितरीत झाल्यानंतर गंगाखेड शुगरद्वारे इतर विविध खात्यांमध्ये वळती करण्यात आली. ज्या शेतकर्‍यांच्या नावाने कर्ज काढले होते, त्यांना कधीच ते कर्ज मिळाले नाहीत. न्यायालयाच्या परवानगीनंतर आता ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये गंगाखेड साखर कारखाना आणि 247 कोटी किमतीची यंत्रसामग्री, इतर तीन संलग्न कंपन्यांची सुमारे 5 कोटी रुपयांची जमीन आणि डिसेंबर 2020 मध्ये यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या काही मालमत्तांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!