Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeकोरोनाविनामास्क फिरणार्‍या शंभर नागरिकांना 14 हजाराचा दंड तहसीलदार, पोलीस अधिकार्‍यांनी केली कारवाई

विनामास्क फिरणार्‍या शंभर नागरिकांना 14 हजाराचा दंड तहसीलदार, पोलीस अधिकार्‍यांनी केली कारवाई


केज (रिपोर्टर) कोरोनाचा धोका पाहता केज शहरातील प्रशासनाने विनामास्क नागरिकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. तहसीलदार, पोलिस अधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरून दुपारपर्यंत शंभर जणांना 14 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसीलदार सचीन देशपांडे, मंडल अधिकारी पवार, तलाठी लहू केदार, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, न.प. अधिकारी सय्यद अन्वर, अय्युब पठाण, अनिल राऊत, असद खतिब सह आदी कर्मचार्‍यांनी रस्त्यावर उतरून मास्क न वापरणार्‍या नागरिकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत शंभर जणांना जवळपास 14 हजार रुपयांचा दंड देण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!