Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडबीड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ शिवाजी धांडे नगरमध्ये आरोग्य कर्मचार्‍याच्या घरी चोरी

बीड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ शिवाजी धांडे नगरमध्ये आरोग्य कर्मचार्‍याच्या घरी चोरी

नगदीसह सोन्याचे दागिने पळविले, दुपारपर्यंत फिंगर पथक दाखल झाले नव्हते
बीड (रिपोर्टर) बी।ड शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ सुरू आहे. रात्री शिवाजी धांडे नगरमध्ये एका आरोग्य कर्मचार्‍यांच्या घरात चोरी झाली. चोरटयाने नगदी रकमेसह सोन्याचे दागिने असा एकुण 60 ते 70 हजार रुपयांचा एैवज चोरून नेला. दुपारी 12 वाजेपर्यंत फिंगर प्रिंट पथक दाखल झाले नव्हते. अधिक्षक कृषी कार्यालयाच्या परिसरातही चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला होता.

विनोद घुले यांच्या घराचे दार उघडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. घरातील नगदी रकमेसह सोन्याचे दागिने असा एकुण 60 ते 70 हजार रुपयाचा एैवज चोरुन नेला. घुले यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्रीच पोलीसांना फोन केला होता. पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यांच्या बाजुला असलेल्या शिंदे यांचे घरही चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. घुले यांच्या घरी आज दुपारी पर्यंत फिंगरप्रिंट पथक दाखल झालेल नव्हते. घुले यांच्या घरी चोरी होण्यापुर्वी चोरटयाने अधिक्षक कृषी कार्यालय परिसरातील एका घरामध्ये चोरीचा प्रयत्न केला होता. चोरटे आल्याची माहिती सबंधीत घर मालकाने शिवाजी नगर पोलीसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस येण्याची भनक लागतात. चोरटे त्याठिकाणाहून पोबारा झाले होते. त्यानंतर त्यांनी घुले यांचे घर फोडले. चोरट्याची एक चप्पल घुले यांच्या दारामध्ये आढळून आली. वाढत्या चोरीच्या घटनेने नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!