Monday, January 24, 2022
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला

बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला


बीड (रिपोर्टर) गेल्या तीन-चार दिवसांपासून बीडमध्ये कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात तब्बल 39 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळण्याची गरज आहे.

महाराष्ट्रासह देशात तिसर्‍या लाटेचा धोका वाढलेला आहे. त्यातच आता बीड जिल्ह्यातही रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज आरोग्य विभागाला 1120 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 1081 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 39 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 9, आष्टी 1, बीड 8, केज 2, माजलगाव 3, परळी 8, पाटोदा 3 आणि शिरूर तालुक्यात 5 रूग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!