Friday, January 28, 2022
No menu items!
Homeकोरोनासावधान, बीड जिल्ह्यात अकराही तालुक्यात रूग्णसंख्या वाढू लागली

सावधान, बीड जिल्ह्यात अकराही तालुक्यात रूग्णसंख्या वाढू लागली

बीड (रिपोर्टर) गेल्या आठ दिवसापूर्वी बीड जिल्ह्यात पाच ते दहा रूग्ण आढळून येत होते मात्र या आठवड्यात बीडमध्ये सर्वच तालुक्यात रूग्णांची आकडा वाढू लागला आहे. आज आलेल्या अहवालात तब्बल 38 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र याकडे व्यावसायिकांसह नागरिक दुर्लक्ष करत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी कडक निर्बंध घालून दिले असले तरी नागरिक आणि व्यापारी हे पायदळी तुडवतात त्यामुळेच बीड जिल्ह्यात पून्हा एकदा रूग्णसंख्या वाढू लागली आहे. आरोग्यविभागाला आज दुपारी 1804 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 1766 जण निगेटिव्ह आढळून आले तर 38 पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये अंबाजोगाई 2, आष्टी 3, बीड 9, धारूर 2, गेवराई 1, केज 4, माजलगाव 1, परळी 2, पाटोदा 6, शिरूर 7 आणि वडवणी तालुक्यात 1 रूग्ण आढळून आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!