Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाविनामास्क सडकफिर्‍यांवर पोलिसांच्या कारवाया

विनामास्क सडकफिर्‍यांवर पोलिसांच्या कारवाया

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शासन प्रशासनाकडून कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र अनेकजण घराबाहेर पडताना मास्क वापरत नसल्याने गेल्या दोन दिवसापासून पेठ बीड पोलिस, शिवाजी नगर पोलिस, बीड शहर पोलिस रस्त्यावर उतरले असून मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाया करत आहेत.
महाराष्ट्रासह देशात तिसर्‍या लाटेत रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातही या आठवड्यात मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढू लागली आहे. प्रशासनाच्या वतीने हळूहळू नियम लावले जात आहेत. लॉकडाऊन जर पाहिजे नसेल तर नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र अनेक सडकफिरे नियम न पाळताच रस्त्यावर उतरतात. अशा सडकफिर्‍यांवर बीड पोलिस कारवाईसाठी रस्त्या उतरले. रात्री शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाने 55 कारवाया केल्या. या कारवाया पीएसआय बाळराजे दराडे,मोसीन शेख, बन्सोडे, पठाण, उबाळे, शिंदे यांनी केल्या. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळपासूनच पेठ बीड पोलिस विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाया करत होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!