Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमवकिलाला जातीमुळे सदनिका नाकारली बांधकाम व्यवसायिकाविरोधात अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल

वकिलाला जातीमुळे सदनिका नाकारली बांधकाम व्यवसायिकाविरोधात अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल

औरंगाबाद (रिपोर्टर) औरंगाबाद शहरामध्ये एका वकिलाला जातीमुळे सदनिका नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी वकिलाने बांधकाम व्यवसायिकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित व्यवसायिकाच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   गेल्या दहा वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली व्यवसाय करणारे अ‍ॅड. महेंद्र पंडितराव गंडले यांना औरंगाबाद येथील भूमी विश्‍वबन फेज-2 हिरापूर साईड येथे रो हाऊस जातीय कारणाने नाकारण्यात आले. या साईटवर फक्त उच्चवर्णीय जातीच्या लोकांना रो हाऊस दिले जाते. महार व इतर जातीच्या लोकांना याठिकाणी रो हाऊस देण्यास साईटचे मालक यांनी सक्त मनाई केल्यामुळे दलित समाजात तीव्र संतापाची भावना उमटली आहे. या प्रकरणी अ‍ॅड. गंडले यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अ‍ॅड. गंडले यांना रो हाऊस पसंत पडल्यानंतर त्याची विक्री 30 लाख रुपयात केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम जमा करायची होती, मात्र तेथील कर्मचार्‍यांकडून जातीची विचारणा झाल्यानंतर त्यांना संबंधित वकील हा महार जातीचा असल्याचे कळल्यानंतर रो हाऊस देण्यास टाळाटाळ करण्यात आली. सदरील प्रकारानंतर भूमी विश्‍वबनचे संचालक त्यांना भेटण्यासाठी गेले असता साईटवरील सर्व रो हाऊसची विक्री झाले असल्याचे सांगण्यात आले. मात्र काही तासातच रिकामे असलेले रो हाऊस विक्री कसे झाले? फक्त जातीयवादी मानसिकतेतून रो हाऊस न घेण्याचा घाट घालण्यात आला. या प्रकरणी अ‍ॅड. गंडले यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार भूमी विश्‍वबन साईटचे मालक सोमाणी, मकरंद देशपांडे, जैन व त्यांच्या इतर भागीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!