Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआहेरवडगांव फाट्यावर विचित्र अपघात ट्रकवर पाठीमागून मोटारसायकल धडकली

आहेरवडगांव फाट्यावर विचित्र अपघात ट्रकवर पाठीमागून मोटारसायकल धडकली

नेकनूर (रिपोर्टर)ः- ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रॅकने धडक दिली. ट्रकला पाठीमागूनच मोटारसायकल धडकली. यामध्ये मोटारसायकल स्वार जखमी झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रात्री दहा वाजता आहेर वडगांव फाटा येथे घडली.
नेकनूर रोडवर आहेरवडगांव फाट्याजवळ ट्रॅक्टर क्र. एम.एच.20, 7663 याला ट्रॅक क्रमांक जि.जे.बी.डब्लयु 8253 ने पाठीमागून धडक दिली. या ट्रॅकला मोटारसायकल क्रमांक एम.एच.23 ए.एच.8615 ने धडक दिली. सदरील ही मोटार सायकल शुभम दयानंद तांदळे वय-24 वर्षे, रा.हिंगणी हा चालवत होता. यात तांदळे हा जखमी झाल्याने त्यास हायवे पोलीसांनी रुग्णालयात दाखल केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!