Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमवक्फ बोर्डाची जमीन बळकावल्या प्रकरणी आतापर्यंत जिल्ह्यात 33 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे...

वक्फ बोर्डाची जमीन बळकावल्या प्रकरणी आतापर्यंत जिल्ह्यात 33 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल

बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात देवस्थानाची शेकडो एकर जमीन आहे. या जमीनीवर काही भुमाफीयांनी डोळा ठेवून या जमीनी स्वतःच्या नावावर करुन घेतल्या. सदरील हा भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी दोषी विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी होत असतांनाच आतापर्यंत फक्त तिन प्रकरणातच गुन्हे दाखल झाले आहे. तिन प्रकरणातील 33 पेक्षा जास्त जणांवर संबधीत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद  करण्यात आला आहे. आरोपीमध्ये शासकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
राज्यामध्ये वक्फ बोर्डाची 97 हजार एकर जमीन आहे. बीड जिल्ह्यातही शेकडो एकर जमीन असून काही भूमाफीयांनी अधिकार्‍यांना हाताशी धरुन जमीनी बळकावल्या आहे. सदरील हा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दोषी विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वस्तरातून होवू लागली. कारवाईसाठी अनेकवेळा काही समाजसेवकांनी आंदोलन सुध्दा केलेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तिन प्रकरणातच कारवाई करण्यात आली. दर्गा कोचकशाहवली (उर्फ शहेंशाहवली ) दर्गाची जमीन बळकावल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आष्टी तालुक्यातील देवी निमगांव प्रकरणी 2 जणांसह इतरांवर गुन्हे दाखल झाले. तसेच आष्टीच्याच चिंचपूर प्रकरणी 16 जणांवर कारवाई झालेली आहे. या गुन्ह्यामध्ये शासकीय अधिकार्‍यांसह इतरांचा समावेश आहे. अन्य प्रकरणाबाबत अद्यापही कारवाई झालेली नाही.
दरम्यान ज्या प्रमाणात बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले त्याच प्रमाणात राज्यातल्या इतर प्रकरणातही वक्फ बोर्डाच्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सर्वच प्रकरणामध्ये कारवाई का होत नाही?असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!