Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडप्रार्थना मंदिरे सुरू आहेत मग ज्ञान मंदिरे बंद का? मुख्यमंत्री, जिल्हाधिकार्‍यांना विद्यार्थ्यांनी...

प्रार्थना मंदिरे सुरू आहेत मग ज्ञान मंदिरे बंद का? मुख्यमंत्री, जिल्हाधिकार्‍यांना विद्यार्थ्यांनी लिहिले पत्र

बीड (रिपोर्टर) ओमिक्रॉनचा धोका पाहता राज्य सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील विद्यार्थ्यांनी भालचंद्र गणपती मंदिरात प्रार्थना करत मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या नावे पत्र लिहिले. प्रार्थना मंदिरे सुरू आहेत, मग ज्ञान मंदिरे का बंद ठेवली? असा सवाल विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
   राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून राज्य सरकारने 15 एप्रिलपर्यंत सर्वच शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवले आहेत. बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने इतर सर्व सुरू ठेवलं मात्र शाळा बंद ठेवल्यामुळे पालकांत आणि विद्यार्थ्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील विद्यार्थ्यांनी आज भालचंद्र गणपती मंदिरात प्रार्थना करत मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या नावे पत्र लिहिले. प्रार्थना मंदिरे सुरू आहेत मग ज्ञान मंदिरे का बंद ठेवली? असा सवाल उपस्थित करत शाळा बंद असल्यामुळे आम्हाला करमत नाही, शासनाच्या अटी व नियम पाळून आमची काळजी आम्ही घेऊ, असं म्हणत शाळा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी या पत्राद्वारे केली. यामध्ये मयुरेश लिंबेकर, स्वप्नील ढवळे, आर्यन फाळके, यश गायकवाड, निखिल वायभट, रुद्र वाणी, शिवाणी आबदार, अक्षरा लगास, अजित जाधव, संस्कार सुकाळे, रिद्धी जाधव, निखील गिरे, वरद साळवे, गणेश वैद्य, आनंदी अवसरे, आदी भालचंद्र सह आदी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!