Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडपेठ बीड भागात घरफोडी ६३ हजाराचा मुद्देमाल लंपास

पेठ बीड भागात घरफोडी ६३ हजाराचा मुद्देमाल लंपास


बीड (रिपोर्टर) घरी कोणी नसल्याचे पाहून कुलूप तोडत चोरट्यांनी पेटीमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल भरदिवसा पेठ बीड भागात घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पेठ बीड भागातील मिनहाजबी महेबूब शेख (वय ३०, रा. नूर कॉलनी, पेठ बीड) हे काल दुपारी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. याचाच फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन घरात प्रवेश करत पेटीत ठेवलेले सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व नगदी ४५ हजार असा एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!