Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमहिलेचे साडेसात तोळ्याचे दागिने लंपास

महिलेचे साडेसात तोळ्याचे दागिने लंपास


बीड (रिपोर्टर) बसमधून प्रवास करत असताना साडे सात तोळ्याचे दागिने एका बॅगमध्ये ठेवून ती बॅग आपल्या शेजारी ठेवली होती. बीड बसस्थानकात आल्यानंतर ती बॅग लंपास झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी महिलेने गेवराई पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अण्णासाहेब श्रीमंत देशमुख (रा. काकडे फ्लॅट रो हाऊस उस्मानाबाद) हे आणि त्यांची पत्नी औरंगाबाद येथून औरंगाबाद ते बीड बस (क्र. एम.एच. २५ बी.एन. २६८२) या बसने दि. १२ जानेवारी रोजी प्रवास करीत होती. या वेळी देशमुख यांच्या पत्नीने साडे सात तोळ्याचे दागिने एका बॅगेत ठेवून ती बॅग आपल्या शेजारी ठेवली होती. ते बीड बसस्थानकात आल्यानंतर ती बॅग त्यांना त्या जागी दिसून आली नाही. आपली बॅग कोणी तरी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!