Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन


तीन महिन्यांपासून पगारा नाहीत, लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे
बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयातील वर्ग ३ आणि ४ चे दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित राहिल्यामुळे आज त्यांनी आक्रमक होत अचानक संप पुकारल्याने सकाळी काही काळ जिल्हा रुग्णालयातील सेवा ठप्प झाल्या होत्या. घोषणाबाजी करत या कर्मचार्‍यांनी पगारासाठी आंदोलन केले. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या लेखी आश्वासनानंतर दुपारी साडे अकरा वाजता त्यांनी आंदोलन मागे घेत काम सुरू केले.


कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासन सतर्क असताना अशा बिकट परिस्थितीत काम करत असताना वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून
देण्यात आले नाही. हे सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष का करते? हा सवाल उपस्तित होत आहे. तीन महिन्यांपासून पगारी न झाल्याने वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांनी आज सकाळी अक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी करत जिल्हा रुग्णालयामध्ये काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे रुग्णालयात काही काळ रुग्णसेवा ठप्प झाली होती. संबंधित कर्मचारी हे इमाने इतबारे काम करत असताना त्यांच्या पगारांकडे मात्र शासन-प्रशासन दुर्लक्ष करते. हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून आक्रमक झालेल्या कर्मचार्‍यांनी जोपर्यंत तीन महिन्यांचं वेतन मिळत नाही तोपर्यंत कामावर जाणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक यांनी यापुढे तांत्रिक अडचणी सोडता महिन्याच्या १ तारखेला देण्यात येईल, प्रशासकीय सर्व प्रश्‍न सोडवण्यात येतील, माहे डिसेंबर २०२१ मासिक वेतन दोन ते तीन दिवसात अदा करण्यात येतील. असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

Most Popular

error: Content is protected !!