Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीड…हा तर सांस्कृतिक दहशतवाद, अभिनेता किरण मानेंच्या समर्थनार्थ धनंजय मुंडे सरसावले

…हा तर सांस्कृतिक दहशतवाद, अभिनेता किरण मानेंच्या समर्थनार्थ धनंजय मुंडे सरसावले


बीड (रिपोर्टर) राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रखर भूमिका घेऊन नेहमीच चर्चेत राहणारे प्रसिद्ध अभिनेता किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्यानंतर स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली ओ’ या प्रसिद्ध मालिकेतून त्यांना तडकाफडकी बाहेर काढल्यानंतर सोशल मिडियावर वेगवेगळ्या स्तरातून संताप व्यक्त होत असतानाच राजकीय नेत्यांकडूनही स्टार प्रवाह च्या भूमिकेचा विरोध केला जात आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाला सांस्कृतिक दहशतवाद संबोधले असून राजकीय दबावाला आणि ट्रोलिंगला बळी पडून स्टार प्रवाहने माने यांना काढून टाकले आहे, असे म्हटले. सोबत त्यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे.


सामाजिक सह राजकीय विषयांवर आपले प्रखर मत मांडणारे प्रसिद्ध सिनेअभिनेता किरण माने यांना स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली ओ’ या मालिकेतून तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आपल्या राजकीय भूमिकेमुळेच मालिकेतून अचानक बाहेर काढण्यात आल्याची पोस्ट किरण माने यांनी केली. त्यामध्ये ‘कॉंटलो जुबान, आँसुओं से गाऊंगा, गाडदो बिज हुँ मै पेड बनजाऊँगा’ अशा प्रकारची पोस्ट केल्यानंतर चाहत्यांकडून त्यांच्या समर्थनार्थ अनेक प्रतिक्रिया येत असून राजकीय नेत्यांनीही माने यांचे समर्थन केले आहे. त्यांना मालिकेतून काढल्याबद्दल स्टार प्रवाहचा निषेध नोंदवला आहे. कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी ट्विट करून सद्य राजकीय परिस्थिती-बद्दल मत व्यक्त करताना ते भाजपाला सहन न झाल्यामुळे स्टार प्रवाहला दबावाखाली घेत त्यांना बाहेर काढल्याचे त्यांनी म्हटले तर जितेंद्र आव्हाड यांनीही किरण मानेंच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली. आज राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक फोटो पोस्ट करत किरण मानेंचे समर्थन करताना आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून किरण मानेसारखा अभिनेता राजकीय विषयावर व्यक्त झाला म्हणून राजकीय दबावाला आणि ट्रोलिंगला बळी पडून स्टार प्रवाहने त्यांना काढून टाकणे म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण आहे, असे मुंडेंनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!