परळी (रिपोर्टर): उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला ज्यांच्यावर गुन्ेहे दाखल आहेत, अशांनाच पुन्हा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देणं म्हणजे ही अश्चर्याची बाब आहे, असे सांगत परळी, अंबाजोगाई, वडवणी या तालुक्यातील अनेक पदाधिकार्यांचा 12 जानेवारी रोजी शिंदे सेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सचीन मुळुक यांनी दिली.
मुळुक यांनी परळीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेला गजानन मुडेगावकर, माऊली गोंडे, राजा पांहे, वैजिनाथ माने यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना मुळुक म्हणाले की, उद्धव बाळासाहेब सेनेमध्ये निष्ठावंतांना न्याय दिला जात नाही, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशांना संघटनेची जबाबदारी दिली जाते. असे सागूंन ते पुढे म्हणाले की, 12 जानेवारी रोजी 54 पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये प्रवेा करणार आहेत.