Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडबिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला


बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली. या हल्ल्यात महिला किरकोळ जखमी असली तरी ती भयभीत झालेली असून तिच्यावर काकूनाना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती होताच घटनास्थळाकडे वनविभागाचे पथक रवाना झाल्याचे सांगण्यात येते.


आष्टी तालुक्यात बिबट्याचे दहशतीचे वातावरण असताना आता बीड तालुक्यातही बिबट्याचा उच्छाद् असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. तालुक्यातील उखंडा येथे एका वगारुवर बिबट्याने हल्ला केल्याचे सांगितले जात असतानाच आज सकाळी बीड-नगर रोडवरील चर्‍हाटा फाटा पेट्रोल पंपाजवळ शेतात इंदू श्रीमंत माने (वय 35) ही महिला दारे धरत होती. त्याच वेळी बिबट्याने पाठीमागून हल्ला केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात महिलेच्या हाताला ओरखांडे दिसून येत असून महिलेच्या गळ्याला मफलर गुंडाळलेले असल्याने ती या हल्ल्यातून वाचली. हल्ल्यानंतर बेशुद्ध झालेल्या महिलेला चर्‍हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून तिला बीड येथील काकूनाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी मुंडे रवाना झाले असून अधिकृतपणे हा बिबट्याचा हल्ला आहे हे अद्याप वन अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले नाही.

Most Popular

error: Content is protected !!