Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमराशनचा 30 टन तांदुळ पकडला डीबी पथकाने केली जालना रोडवर कारवाई

राशनचा 30 टन तांदुळ पकडला डीबी पथकाने केली जालना रोडवर कारवाई

बीड (रिपोर्टर) बीडहून गुजरातला राशनचा तांदुळ जात असल्याची माहिती शिवाजीनगरच्या डीबी पथकाला झाल्यानंतर त्या पथकाच्या अधिकार्‍यांनी जालना रोडवरील साई पॅलेससमोर ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये जवळपास 30 टन तांदुळ असल्याचे सांगण्यात आले. सदरील हा तांदुळ कोणाचा आहे? याची चौकशी सुरू होती. आज दुपारी बीड शहरामधून ट्रक (क्र. एम.एच. 23 डब्ल्यू. 3495) यामध्ये राशनचा तांदुळ जात असल्याची माहिती शिवाजीनगरच्या डीबी पथकाला झाल्यानंतर पथकाचे प्रमुख बाळराजे दराडे, फेरोज पठाण सह आदींनी जालना रोडवरील साई पॅलेससमोरून सदरील ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये जवळपास 30 टन तांदुळ असल्याचे सांगण्यात आले. हा तांदुळ बीडमधून गुजरातकडे जात होता. तांदुळ नेमका कोणाचा आहे? कोण घेऊन जात होतं? कुठल्या गोडाऊनमधून माल उचलण्यात आला यासह अन्य बाबींची चौकशी पोलीस करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!